रत्नागिरी : राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त विशेष मोहीम

रत्नागिरी : राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे २६ जून ते ४ जुलै कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सहज आणि वेळेत उपलब्ध करून देणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

विशेषत: व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्तांनी केले आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीईटी, क्लॅट व जेईई इत्यादी परीक्षा दिलेल्या आहेत, तसेच त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती कार्यालयामध्ये अर्ज दाखल आहे, मात्र प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने अद्याप जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी या कालावधीमध्ये समिती कार्यालयाशी व्यक्तिशः अथवा पालकांमार्फत संपर्क साधून त्रुटी पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 26-06-2025