गुहागर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंता पदावर विष्णू पवार रुजू

गुहागर : पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंता पदी विष्णू प्रल्हाद पवार यांची नियुक्ती झाली असून बुधवारी या पदावर रुजू झाले आहेत. बुधवारी तालुक्यातील सर्व ठेकेदार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील पदाधिकारी यांनी उपअभियंता विष्णू पवार यांचे स्वागत केले. या अगोदर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंता पदी मंदार छत्रे होते. त्यांनी उत्तम काम केले होते. त्यांची बांधकाम विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी विष्णू पवार यांची नियुक्ती झाली आहे.

उप अभियंता पदावर रुजू झालेले विष्णू प्रल्हाद पवार हे सन २००२ मध्ये खेड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यानंतर सन २०१४ मंडणगड पंचायत समितीमध्ये पाणी पुरवठा विभागात शाखा अभियंता, सन २०२४ मध्ये दापोली पंचायत समिती मध्ये पाणी पुरवठा विभागात उप अभियंता म्हणून रुजू झाले. आता गुहागर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उप अभियंता पदी रुजू झाले आहेत. उप अभियंता विष्णू पवार हे मंडणगड तालुक्यातील कुंबळे गावचे रहिवासी आहेत. गुहागर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेतील सर्वच योजना मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे विष्णू पवार यांनी सांगितले. मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, ठेकेदार विनोद पवार, ठेकेदार तुषार पवार, पत्रकार गणेश किर्ते आदी मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 26/Jun/2025