नवी मुंबई, ता. २५ जून: गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडने (Godrej & Boyce Mfg. Co. Ltd.) विविध पदांसाठी ‘वॉक-इन-इंटरव्ह्यू’चे आयोजन केले आहे. शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी नवी मुंबईतील महापे येथे हे मुलाखती घेण्यात येणार आहेत. मशीन ऑपरेटर, क्वालिटी अँड स्पेशल प्रोसेस, फिटर यांसारख्या अनेक क्षेत्रांतील कुशल उमेदवारांना गोदरेजमध्ये नोकरीची ही एक उत्तम संधी आहे.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
भरली जाणारी पदे:
- मशीन ऑपरेटर (Machine Operator)
- CNC Milling/VMC Machine
- CNC Turning/CNC Turnmill
- CNC Vertical Turning
- EDM/Wirecut Machine
- Cylindrical Grinder Machinist
- Hydraulic Press Machine
- क्वालिटी अँड स्पेशल प्रोसेस (Quality & Special Process)
- NDT Inspector
- QC Inspector
- CMM Programmer/Operator
- Lab Technician
- इतर कुशल पदे:
- Electroplater
- Spray Painter
- Welder (TIG/MIG) – Welding of SS, Inconel, Titanium Sheet
- फिटर (Fitter)
- Assembly Fitter
- GTAW/GMAW TIG
- Testing Fitter
- Bench Fitter
- Maintenance Fitter
पात्रता निकष: या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास, आयटीआय (ITI), एनसीव्हीटी (NCVT) किंवा मेकॅनिकल डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वॉक-इन-इंटरव्ह्यू तपशील:
- दिनांक: शुक्रवार, ४ जुलै २०२५
- वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००
- स्थळ: कंट्री इन अँड सूट्स बाय रॅडिसन (Country Inn & Suites by Radisson, Plot No X-4/5-B, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Shilphata Road Navi Mumbai-400701, India)
महत्त्वाची सूचना: मुलाखतीसाठी येताना सर्व उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे तसेच फोटोकॉपी सोबत आणणे अनिवार्य आहे. यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले, मागील पगाराची माहिती आणि ओळखपत्राशी संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे.
ज्या उमेदवारांना वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहता येणार नाही, ते आपले अर्ज पुढील ७ दिवसांच्या आत hrd@godrej.com या ईमेल आयडीवर पाठवू शकतात.
गोदरेजमध्ये करिअर करण्याची ही एक चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.













