गुहागर : तालुक्यातील तळवली मोठी बौद्धवाडी येथे सोमवार दि. २३ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास अचानक वाढलेल्या विद्युत दाबामुळे आणि विद्युत पोलावरील स्पार्किंगमुळे नागरिकांच्या घरांतील टीव्ही, बल्ब यासारख्या विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली असून, काही घरांमध्ये थेट करंट येत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
घटनेत सखाराम लक्ष्मण पवार, अनंत शिवराम कांबळे आणि अनंत हरिश्चंद्र पवार यांची घरातील टीव्ही आणि बल्ब पूर्णतः जळून गेले आहेत. विशेष म्हणजे याच लाईनवर असलेल्या रमेश सुखदेव पवार, अनिल हरिश्चंद्र पवार यांच्या घरांमध्येही विद्युत प्रवाह थेट वायरिंगद्वारे (करंट) येत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
या प्रकारात आणखी चिंतेची बाब म्हणजे, महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नाहीत आणि ते गावातही वास्तव्यास नाहीत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. विद्युत संबंधित गंभीर समस्या उद्भवल्यावर तत्काळ संपर्क साधण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणीच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 26/Jun/2025














