चिपळूणमध्ये २८ जून रोजी हवामान बदलावर पर्यावरणविषयक प्रशिक्षण

चिपळूण : हवामान बदल, प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर आधारित एक दिवसीय जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २८ जून रोजी करण्यात आले आहे. ‘शाश्वत कोकण परिषद’ या पर्यावरणासाठी कार्यरत संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता मार्गदर्शन करणार आहेत.

शहरातील चिंचनाका काणे बंधू हॉलमध्ये सकाळी ११ ते सांय ४ हा कार्यक्रम होणार आहे. या प्रशिक्षणात हवामान बदलाचा धोका, पर्यावरणीय प्रदूषण, सादरीकरण, वैज्ञानिक निरीक्षण, आपत्ती काळातील कायदे आणि कृती आराखडा आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. परिसरातील पर्यावरणीय आपत्ती, वाढते तापमान, अतिवृष्टी यासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

चिपळूण परिसरातील पर्यावरणीय आणि मानवतावादी भूमिका असणाऱ्या नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभघ्यावा, अधिक माहितीसाठी मल्हार इंदुलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 26/Jun/2025