रत्नागिरी : हवामान कार्यालय १ ते १.३० बंद होते, ही गोष्ट आम्हास मान्य आहे. आम्ही त्यात सुधारणा करू. माध्यमांनी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन, वस्तुस्थितीची शहानिशा करणे आवश्यक होते, असा खुलासा हवामान कार्यालयाचे प्रभारी अधिकारी आर. बी. सोनार यांनी दिला आहे.
सोनार यांनी पाठवलेल्या खुलाश्यात म्हटले आहे, रत्नागिरीतील हवामान केंद्र हे २४ तास कार्यरत असून तेथे चार शिफ्ट मध्ये हवामान डेटा कलेक्ट करून तो कुलाबा वेधशाळेत पाठवण्याचे काम चालते. एका शिफ्ट मध्ये फक्त २ कर्मचारी काम करत असतात. अलीकडेच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा २० जून रोजी मृत्यू झाल्याने एका कर्मचाऱ्याला डबल ड्यूटी करावी लागत आहे.
२३ जून रोजी मी स्वतः व माझ्या सोबत चे एक कर्मचारी दुपारी १ वाजे पर्यंत ऑफिस मध्ये व्यक्तीशः हजर होतो. पाणी बिल भरणा तसेच पोस्ट ऑफिस कामासाठी मी १ वाजता निघून गेलो, तसेच दुसरे कर्मचारी यांना डबल ड्यूटी असल्या कारणाने जेवून येतो सांगून ऑफिसच्या मागेच असणाऱ्या निवासस्थानी जेवण करण्यासाठी निघून गेले. दुपारी १.१० वाजता पत्रकार आले असता, ऑफिसमध्ये कोणीतरी आले आहेत हे पाहून ते जेवण अर्धवट सोडून तो कर्मचारी ऑफिसमध्ये आला व त्यांनी पत्रकारांना काय काम आहे व तुम्हाला साहेबांशी बोलायचे आहे का, फोन लावून देऊ का हेदेखील विचारले, पण त्यांनी तुमचं ऑफिस बंद आहे, आम्ही तक्रार करणार असे सांगितले व निघून गेले. १.३० वाजता मी स्वतः ऑफिसमध्ये आलो.
दुपारी १ ते १.३० ऑफिस बंद होते ही गोष्ट आम्हास मान्य आहे व ती आमची चूक आम्ही मान्य करतो. स्टाफ कमी असल्यामुळे असे घडले. त्या दिवशी एक कर्मचारी सकाळी ७वाजल्या पासून सेवेवर आहे व परत त्याला १ ते संध्याकाळी ७ अशी १२ तास सेवा करायची होती, असे खुलाशात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 26/Jun/2025














