कडवई : महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळाची सभा रविवारी सातारा येथे हिंदी भवन येथे पार पडली. या सभेत राज्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये श्रीम. क. पां. मुळ्ये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळंबेच्या राजेंद्र लक्ष्मण खांबे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
राजेंद्र खांबे हे अतिशय अभ्यासू शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते कोळंबे येथे गेली २८ वर्षे हिंदी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००४ पासून त्यांनी हिंदीच्या प्रचार प्रसाराचे काम सुरू केले. त्यांची हुशारी पाहून त्यांना संगमेश्वर तालुका हिंदी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष बनविण्यात आले. तेव्हापासून त्यांनी संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यात हिंदी विषयासाठी खूप मेहनत घेतली आहे. याआधी ते जिल्हा मंडळावर कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
खांबे हे स्काऊट गाईड विभागाचे जिल्हा ट्रेनिंग कमिशनर देखील आहेत. अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाची राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी राज्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत खेडेकर, कोषाध्यक्ष रमाकांत पवार यांनी अभिनंदन केले. खांबे यांचे सर्व थरातून त्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 26/Jun/2025














