रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे! रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील मित्रत्व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रीय खेळाडू संतोष (बाबू) तोडणकर यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी कुमार गट (२२ वर्षांखालील मुले) संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
संतोष तोडणकर हे नवोदित कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. अनेक उदयोन्मुख खेळाडूंना त्यांनी कबड्डीचे धडे दिले असून, त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यास मदत केली आहे. कबड्डी खेळाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊनच त्यांची ही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि कबड्डी वर्तुळातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. संतोष तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचा कुमार गट कबड्डी संघ उज्ज्वल यश संपादन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 26-06-2025














