‘आवडेल तेथे प्रवास योजने’तून रत्नागिरी आगारात लाखोंची उलाढाल..

रत्नागिरी : राज्यमार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या कमी पैशात महाराष्ट्र भ्रमंती, धार्मिक, विविध पर्यटक करण्यास संधी मिळावी म्हणून आवडेल तेथे प्रवास या योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा फायदा मागील वर्षासह यंदाच्या वर्षी लाखो प्रवाशांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. राज्यासह, जिल्ह्यात छोटे व्यापारी, उद्योजक, छोटे विक्रेते अशा अनेकांना कामानिमित्त सलग काही दिवस एसटीचा प्रवास करावा लागतो. अनेक हौशी आठवड्याची सुट्टी घेवून मनसोक्त भ्रमंती करतात. अशा प्रवाशांसाठी असलेल्या आवडेल तेथे प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून रत्नागिरी आगारासह इतर डेपोस लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे.

राज्यमार्ग परिवहन महामंडळाने १९८८ मध्ये दहा दिवसांसाठी पास देत आवडेल तेथे प्रवास ही योजना सुरू केली. एप्रील २००६ मध्ये योजनेची पुनर्रचना करण्यात आली. दहा दिवसाचा पास रद्द करीत ४ दिवस आणि ७ दिवस पासचा समावेश करण्यात आला. शहर वाहतुकीसह राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीत एसटी ज्या ठिकाणी पोहोचते अशा सर्व ठिकाणांपर्यंत या पासची वैधता आहे. पासधारकांना आरक्षण करून प्रवासाची मुभा आहे.

यासाठी स्वतंत्र आरक्षण शुल्क भरावे लागते, प्रौढ आणि मुलांसाठी वेगळे दर आहेत. पासधारकांमध्ये तीर्थक्षेत्रांसह,पर्यटन स्थळांकडे विशेष भर आहे. कोकणातील रत्नागिरी शहर, गणपतीपुळे, विविध प्राचीर मंदिरे, समुदकिनारे यासह विविधवाबी पाहण्यासाठी पर्यटक या योजनेचा वापर करून कोकणात येत तसेच इथेल नागरिक मुंबई, पुणेसह विविध धार्मिक, पयर्टन ठिकाणी जातात. जत्रा यात्रा, सलग सुट्टया, उत्सव, सण यासह विविध काळात पासची मागणी वाढत असते असेही सांगण्यात आले. आतापर्यंत हजारो, लाखोंच्या संख्येने प्रवास केला असून लाखोंची उलाढाल रत्नागिरी आगार, डेपोची झाली आहे.

कमी खर्चात महाराष्ट्राचा प्रवास
कमी खर्चात आवडेल तेथे महाराष्ट्र प्रवास करता यावा म्हणून एसटी महामंडळाने आवडेल तेथे प्रवास या योजनेची सुरूवात करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर १० दिवसां ऐवजी आता ४ ते ७ दिवसांचा पासा करण्यात आला आहे. याला ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुलांसाठी, प्रौढांसाठी वेगवेगळे तिकिटाचे दर असल्याचे सांगण्यात आले. तिकिटाचे वाढल्यामुळे दरात थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

उन्हाळी सुट्ट्या, दररोजचा लांबचा प्रवास करणारे, पर्यटन करणारे प्रवासी आवडेल तेथे प्रवास या योजनेचा लाभ घेतात. रत्नागिरी आगारासह इतर डेपोस या योजनेचा चांगला फायदा मिळत आहे. लाखोंची उलाढाल या योजनेतून होत असते. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे- सुनील सुर्वे, वाहतूक नियंत्रक, रत्नागिरी

तिकिटाचे दर वाढल्यामुळे प्रवास महागला
राज्यात एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के दरवाढ लागू झाली असून वाढीव दरानुसार आवडेल तेथे प्रवास योजनेतील पास दरवाढीचा फटका बसत आहे. साध्या गाडी, शिवशाही, ईशिवाई बसेसचे दर वाढले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 28/Jun/2025