गुहागर : रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

श्रृंगारतळी : गुहागर शहरातील रिक्षाचालक पराग कमलाकर भोसले यांनी बाजारपेठेमध्ये रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे मालकाला परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. हे पाकीट सलोनी शेखर विखारे यांचे होते. ते त्यांना परत करण्यात आले. त्यांच्या या प्रसंगावधनाबद्दल परिसरात कौतुक केले जात आहे.

गुहागर एसटी आगारासमोरील रिक्षा स्टँडजवळ ८,५०० रुपये असलेले पाकीट रिक्षाचालक पराग भोसले यांना पडलेले सापडले. त्यांनी हे पाकीट पाहाताच एका पतसंस्थेची पिग्मी एजंट सलोनी शेखर विखारे यांचे असल्याचे लक्षात आले. त्याची त्यांनी पूर्ण खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी सलोनी विखारे यांच्याशी संपर्क करून त्यांचे हे पाकीट त्यांच्याकडे सुपूर्त केले.

पाकिट परत केल्याबद्दल सलोनी विखारे यांनी रिक्षाचालक पराग भोसले यांचे आभार मानले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघटना व विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 26/Jun/2025