चिपळूणमध्ये घरफोडी: सावर्डा येथील फ्लॅटमधून टीव्ही लंपास

चिपळूण, ता. २६ जून : चिपळूण तालुक्यातील सावर्डा येथील वहाळफाटा येथील क्लासिक रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटमध्ये घरफोडी होऊन सुमारे ६,००० रुपये किमतीचा टीव्ही चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ जून रोजी रात्री ११ ते २४ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रमोद गंगाराम कदम (वय ५६, रा. मळ, मधलीवाडी, चिपळूण; सध्या रा. ओम निवास, वडाळा, मुंबई ३५) यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. कदम हे त्यांचा वहाळफाटा येथील फ्लॅट क्र. १०२ ला कुलूप लावून मुंबईला गेले होते. याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातून १५ वर्षांपूर्वीचा जुना असलेला एल.जी. कंपनीचा ५१ इंचाचा स्मार्ट टीव्ही (अंदाजे किंमत ६,००० रुपये) चोरून नेला.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 26-06-2025