चिपळूण, ता. २६ जून : चिपळूण तालुक्यातील खांदाट येथील मोरवणे फाटा परिसरात एका २७ वर्षीय विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल, २५ जून रोजी सकाळी ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास घडली.
सौ. शकुंतला अशोक चव्हाण (वय २७, रा. खांदाट, मोरवणे फाटा, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. माहितीनुसार, शकुंतला यांनी घरात कोणीही नसताना घराचे सर्व दरवाजे आतून लावून घेतले. त्यानंतर त्यांनी बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईसीजी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४०/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 26-06-2025














