देवरूख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी केशरचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला. यात ममता मुंडेकर व सिद्धी गुरव यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेच्या सुरुवातीला महिला विकास कक्ष समन्वयक प्रा. सानिका भालेकर यांनी केशरचना स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांकडे उपजत असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महाविद्यालयात सतत घेतल्या जातात, यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी पर्यवेक्षक एम. आर. लुंगसे, प्रा. सीमा कोरे आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
केशरचना स्पर्धेत विद्यार्थिनींच्या २४ जोड्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. संचिता चाळके यांनी केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक (विभागून) सिद्धी गुरव व शितल वाजे (१२वी वाणिज्य-ब) आणि ममता मुंडेकर व श्रावणी खांडेकर (११ वी बैंकिंग). द्वितीय क्रमांक रिया पड्ये व पूजा शिंदे (११वी कला).
तृतीय क्रमांक पूर्वा वेद्रे व रिया केदारी (११वी संयुक्त) यांनी मिळवीला. उत्तेजनार्थ म्हणून सेजल वास्कर व सई मुंडेकर (१२वी कला) आणि जान्हवी सावंत व सिद्धी सुतार (११वी वाणिज्य).
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 15/Oct/2024









