चिपळूण : तालुक्यातील पश्चिम विभागातील रामपूर मार्गताम्हाणे परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळीवारा आणि पावसात शिरवली येथे महावितरणच्या तारेवर झाड पडून दोन पोल मोडले, तर सुरेश महाडिक यांच्या घराची पडवी कोसळून लाखाचे नुकसान झाले. यात आंब्याची कलमेही कोलमडली आहेत.
तालुक्यातील डुगवे, गुढे, कळमुंडी, शिरवली येथेही वादळीवाऱ्यात महावितरणचे पोल पडले. विद्युततारांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युततारा तुटण्याचे प्रकार घडले. या घटनेत महावितरणचे लाखोंचे नुकसान झालेच शिवाय परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली.
कनिष्ठ अभियंता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मार्गताम्हाणे, बोरगाव येथे ट्रान्स्फॉर्मर विद्युतरोहित्र बंद पडले आहे, तर वाघिवरे येथे पोल पडून विद्युततारा तुटल्या. सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे पडणे, फांद्या पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. शिरवली वेलोंडेवाडीतील स्लॅबवरील पत्रे उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 27/Jun/2025














