रत्नागिरी शहरात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती फेरी

रत्नागिरी : शहर पोलिस ठाण्याच्या वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त (ता. २६) जनजागृती रॅली आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेमध्ये अमली पदार्थ विरोधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यानिमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली शिर्के हायस्कूल, माळनाका, थिबापॅलेस रोड फाटा, अद्वैत पेट्रोल पंप, माळनाका गार्डन, शासकीय विश्रामगृहमार्गे पुन्हा शिर्के प्रशाला अशी काढण्यात आली. रॅलीत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. जनजागृती कार्यक्रमासंदर्भात शिर्के विद्यालयाच्या सभागृहात प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. त्यामध्ये मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी जागतिक अमली पदार्थ दिनाची माहिती दिली. शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सामाजिक व मानसिक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 27/Jun/2025