रत्नागिरी : वीजदर कपातीचा जिल्ह्यातील साडेपाच लाख वीज ग्राहकांना मिळणार दिलासा

रत्नागिरी : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी ५ वर्षांत कपात करण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात कपातीचा प्रस्ताव महावितरणकडून सादर झाला आणि आयोगाने पाचही वर्षांत वीजदर कमी करण्याचा आदेश दिला आहे. स्मार्टमीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन ही आदेशाची वैशिष्ट्ये आहेत. वीजदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना २.० ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:10 PM 27/Jun/2025