Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी

नवी दिल्ली : मराठा आरक्षण याचिकेवर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली होती.

या प्रकरणात वकिलांनी ११ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला. या प्रक़रणात मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा नाकारला असून, या याचिकेवर त्या न्यायालयात सुनावणी सुरूच राहणार आहे. हा घटनाक्रम वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला कथन केला.

हे सारे म्हणणे विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात (१४ जुलैच्या आसपास) सुनावणी घेण्याचे ठरविले.

२०२४ च्या मराठा आरक्षण कायद्याकायद्यानुसार मराठा समुदायाला शिक्षणात, तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आले. हा कायदा निवडणुकांत चर्चेचा विषय ठरला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 27-06-2025