रत्नागिरी : देशावर लादलेल्या आणीबाणीच्या दिवसाला बुधवारी पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या वीरांचा रत्नागिरीत भारतीय जनता पक्ष शहर मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.
भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आणीबाणीच्या लढ्यात सहभागी झालेले प्रदीप चंद्रकांत परुळेकर, सुभाष श्रीधर राणे, शिवराम बाळकृष्ण ठीक, महेंद्र रामचंद्र सुर्वे, श्रीकांत अनंत मुकादम, बळवंत मधुसूदन वेलणकर, संजय शांताराम केतकर, विवेक जगन्नाथ भावे या सत्कारमूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर यांनी त्या काळातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिला शहराध्यक्षा पल्लवी पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी बाबासाहेब परुळेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 27-06-2025














