रत्नागिरी : डॉ. आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा

रत्नागिरी : गयाळवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह इमारतीचा प्रवेश सोहळा गुरुवारी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, एचडीएफसी बँकेचे शाखाधिकारी रामकृष्ण सावंत यांच्या उपस्थितीत झाला.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी श्री. सातपुते, श्री. घाटे, श्रीमती सोनटक्के, श्री. सावंत आणि जागा मालक प्रसाद शारबिर्दे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. गृहपाल रवींद्र कुमठेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, समतादूत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 27-06-2025