खेड तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो

खेड : तालुक्यातील सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के भरली असून, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील ज्या भागांना उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याचा उपयोग होणाऱ्या गावासाठी ही आनंदाची बातमी आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असली तरी नियमित पावसाची हजेरी लागत असल्यामुळे यावर्षी धरणात पुरेसा पाणीसाठा होईल, अशी आशा आहे. तालुक्यातील नातूनगर भागात नातूवाडी व शिरवली धरण प्रकल्प आहे. शिव खाडीपट्टा भागात कोंडीवली धरण, पंधरागाव विभागात तळवट शेलारवाडी गणवाल धरण, शेल्डी धरण, सातगाव खोपी विभागात शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने पूर्णत्वास नेले आहेत.

यावर्षी २५ जुनपर्यंत तालुक्यातील तळवट धरणात ४.६७ दशलघमी, शेलारवाडी धराणात-८.०४६, नातृवाडी धरणात १८ ३७७, पिंपळवाडी धरणात १७.९४८, कोडावली धरणात २.५५५, शिरवली धरणात २.३६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तालुक्यातील नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प शिरवली लघु पाटबंधारे व पिंपळवाडी लघु पाटबंधारे तीनही प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 27/Jun/2025