मंडणगड : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून ९ घरे, ५ गोठे, सार्वजनिक वास्तू, पोल्ट्री यांची पडझड होऊन ७ लाख २५ हजार ६४० रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथील पार्वती गावणूक यांचे २४ हजार, माहू येथील नंदकुमार रेडीज यांचे २० हजार, चिंचघर येथील अनिता काणेकर यांचे घर १ लाख ३५ हजार, दहागाव येथील कल्पेश गांधी यांचे १ लाख ६५ हजार ६०० रुपयाचे नुकसान झाले.
कुडुकखुर्द येथील भिकू चव्हाण यांचे ३० हजार, दहागाव येथील हुसैन जोगीलकर यांचे गोठ्याचे ३५ हजार, लाटवण येथील सुनील सकपाळ ९ हजार १२५, पिंपळोली येथील सहदेव गायकवाड यांचे १२ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. भोळवली येथील कल्पना गोपाळ यांचे ९ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. पिंपळोली येथील अरुण विचार यांचे गोठ्याचे अंशतः नुकसान होऊन घराची पडझड झाल्याने ५७ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले. चिंचघर येथील संतोष पिंपळकर यांचे घर अंशतः नुकसान होऊन घराची पडझड झाल्याने ९ हजारांचे नुकसान झाले.
भोळवली येथील विठ्ठल कोकळे ६ हजार, भोळवली येथील सुजाता कोकळे ८ हजार ७५०, कादवाण येथील सुभाष पवार ४ हजार ४००, आंबवणेखुर्द अंगणवाडीचे पावसात नुकसान झाल्याने १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. केळवत येथील सागर भोगल यांच्या पोल्ट्रीची पडझड झाल्याने ७९ हजारांचे नुकसान झाले. मंडणगड हायस्कूलच्या इमारतीची पडझड झाल्याने ३५ हजारांचे नुकसान झाले. मंडणगड बाजारपेठेत योगेश खापरे यांच्या दुकानाची पडझड झाल्याने ३ लाखांचे नुकसान झाले. केंगवळ येथील राजेश शिगवण यांचा बैल वाहून गेल्याने ३५ हजारांचे नुकसान झाले.
भरपाई मिळावी…
पावसामुळे मंडणगड तालुक्यातील शाळांसह शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्यांचे नुकसानीसह पशुधनाचीही हानी झाली. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 27/Jun/2025














