रत्नागिरी : अनिता अजित रजपुत, (५७) या ५ जून २०२५ सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घर नं. १६७, पोमेंडी खुर्द, काजरघाटी या त्यांच्या राहत्या घरातून कोणलाही न सांगता निघून गेल्या व नापत्ता झाल्या आहेत.
त्या अशिक्षीत आहेत, उंची ५ फूट, सडपातळ बांधा, रंग सावळा, काळे डोळे, सरळ नाक, केस काळे लांब, अंगात नेसणीस पांढऱ्या रंगाची साडी त्यावर ठिपके असलेली व ब्लाऊज, पैसे अंदाजे १ हजार ५०० रुपये रोख रक्कम, मोबाईल नाही. वरील व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा आढळल्यास शहर पोलिस ठाणे, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 27/Jun/2025














