खेड : तालुक्यातील शेवरीचा माळ या जंगलमय भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २५ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वा. च्या सुमारास करण्यात आली. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत विनायक वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक विश्राम यादव (४५, रा. जैतापूर, कावणकर वाडी, ता. खेड) या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
संशयित अशोक यादव याने गावातील लोकांना विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू आपल्या ताब्यात बाळगली होती. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून दोन प्लॅस्टीकचे ५-५ लिटरचे कॅन, एकूण १० लिटर दारू (किंमत अंदाजे १०००/-) व २०/- किंमतीचा स्टीलचा ग्लास असा एकूण १०२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 27/Jun/2025














