देवरुख : घनकचरा व्यवस्थापनातून महिला बचत गटांच्या हाताला काम

देवरुख : घनकचरा व्यवस्थापनातून महिला बचत गटांचा उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत देवरुख नगरपंचायतीच्या महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. देवरुख शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याच्यावर प्रक्रिया करून महिलांच्या हाताला कशाप्रकारे काम उपलब्ध होईल याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनामध्ये महिला बचत गटांच्या समावेश करून त्यांना त्यातून उपजीविकेचे साधन निर्माण करून देणे हे होते. या प्रशिक्षणात अधिकारी यांनी महिलांना सद्यःस्थितीत कचऱ्यामुळे मोठ्या शहरात काय समस्या निर्माण होते. त्याचे प्रेझेंटेशन व फोटो दाखवण्यात आले. त्यानंतर महिलांना तुमच्या शहरात कचरा व्यवस्थापन कसे होते, याची माहिती देण्यात आली. तसेच शासनाने कचरा किती प्रकारचा गोळा करावा. त्याचे संकलन कसे करावे व त्याच्यावर प्रक्रिया कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये बचत गटांच्या महिला या घनकचऱ्यामध्ये कचरा वर्गीकरणाचे काम कशा पद्धतीने करतात, याची माहिती देण्यात आली. कचऱ्यापासून कुठल्या प्रकारचे उत्पन्न निर्माण करता येते. ओल्या कचऱ्यापासून खत बनवता येते. प्लास्टिक कचऱ्यापासून प्लेट्स बनवता येतात. तसेच कापडापासून वेगवेगळ्या सुंदर प्रकारच्या वस्तू बनवता येतात याबद्दल माहिती देण्यात आली.

स्वयंसहायता गटातील महिलांसाठी घनकचरा व्यवस्थापनातून उपजीविकेच्या संधी याविषयी कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या उद्घाटनाप्रसंगी देवरुख नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे उपस्थित होते. कार्यशाळेत प्रशिक्षक श्रीधर कोकरे, गीता पाठक यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी स्वयंसहायता गटातील ७० महिला उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 27/Jun/2025