राजापूर : नागरिकांना होणाऱ्या त्रासानंतर अखेर राजापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने बुधवारी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या पाच जनावरांना पकडून जीर्ण विश्रामगृहात ठेवले आहे. या जनावरांच्या मालकांचा शोध घेण्यात येणार असून, त्यांच्यावर नगरपरिषद कोणती कारवाई करते हे पाहायचे आहे.
राजापूर नगरपरिषदेचा पूर्वीचा जनावरांसाठीचा कोंडवाडा पाडल्यानंतर नवीन कोंडवाड्याचा प्रस्तावच तयार केलेला नाही. त्यामुळे पकडलेल्या मोकाट जनावरांना ठेवायचे कोठे, असा प्रश्न नगरपरिषद प्रशासनासमोर उभा राहत आहे. वारंवार तक्रारी झाल्यानंतर मोकाट जनावरांबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने अनेक महिन्यांनंतर हालचाल सुरू केली आहे.
शहरातील रस्त्यांवर किमान पन्नासपेक्षा अधिक मोकाट जनावरे फिरत असतात. त्यापैकी पाच जनावरांना पकडून नगरपरिषदेच्या मालकीच्या जीर्ण विश्रामगृहात ठेवण्यात आली आहेत. आता या गुरांचे मालक तीन दिवसांत न आल्यास त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 27/Jun/2025














