दापोली : लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ड्रिमलॅण्ड रिसॉर्ट, महर्षी अण्णासाहेब कर्वे बीच, मुरुड येथे भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
‘शोषणमुक्त – जागो ग्राहक जागो – भ्रष्टाचार विरहित’ या उदात्त उद्दिष्टाने भरलेल्या या कार्यक्रमास ग्राहक संरक्षण व सार्वजनिक हितासाठी कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या शिबिरात मा. श्री. मोहन सालेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. दिनकर आमकर, डॉ. दिलीप तळदेवकर (राष्ट्रीय अध्यक्ष), श्री. चंद्रकांत खोपटकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.
कार्यक्रमास मा. डॉ. विजयकुमार सूर्यवंशी (प्रांताधिकारी, दापोली), मा. श्रीमती अर्चना बोंबे (तहसीलदार), मा. श्री. विवेक आयरे (पोलीस निरीक्षक), मा. श्री. गणेश मंडलिक (गटविकास अधिकारी) यांसह प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात ग्राहकांचे अधिकार, शासकीय योजना, भ्रष्टाचाराविरोधातील जनजागृती, आणि लोककल्याण विषयक मार्गदर्शन देण्यात आले. विशेष म्हणजे कोकण विभाग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. महिला विभाग, अल्पसंख्यांक प्रतिनिधी, आणि व्यापारी संघटनांचेही सक्रिय सहकार्य लाभले.
स्थानिक प्रतिनिधींपैकी दापोली तालुकाध्यक्ष श्री. योगेश महाडिक व कार्यकारिणी सदस्यांनी शिबिराचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले.
कार्यक्रमाचे संयोजन उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 27-06-2025














