पुणे : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या निवड यादीसाठी विद्यार्थी, पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारीही (२६ जून) जाहीर झाली नाही.
त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेचे आणखी एक सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली असून, नव्या वेळापत्रकानुसार आता पहिल्या फेरीची निवड यादी ३० जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने प्रथमच राज्य पातळीवर राबवण्यात येत आहे. प्रवेशासाठीच्या संकेस्थळावरील माहितीनुसार राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यात १६ लाख ६० हजार ८४ जागा कोटा प्रवेशासाठी, तर ४ लाख ६३ हजार ६३६ जागा कोटा प्रवेशासाठी आहेत. प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. कोट्यातून ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 27-06-2025














