सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण

Gold Silver Rates : आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. सोनं सतत स्वस्त होत असून ते प्रति १० ग्रॅम १०२४ रुपयांनी घसरून ९६१३५ रुपयांवर आलं. चांदीच्या किमतीत ३५० रुपयांची घट झाली आहे आणि ती प्रति किलो १०६८०० रुपयांवर आली.

जीएसटीमुळे सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १००००० रुपयांच्या खाली गेली आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ९९०१९ रुपये दरानं विकलं जात आहे, तर चांदी ११०००४ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

१८ कॅरेटचा दर काय?

आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव १०२० रुपयांनी घसरून ९५,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ९३८ रुपयांनी घसरून ८८,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ही ७६८ रुपयांनी कमी होऊन ७२,१०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव ६६,९९६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात जीएसटी आणि मेकिंग चार्जचा समावेश नाही.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केले आहेत. त्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 27-06-2025