चिपळूण : पेठमाप- मुरादपूर पुलाच्या अॅप्रोचचे काम रखडल्याने गैरसोय

चिपळूण : शहरातील पेठमाप-मुरादपूरला जोडणाऱ्या वाशिष्ठी नदीवरील पूलामुळे चिपळूण बाजारपेठमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. शिवाय या पूलामुळे बाजारपेठ जवळील अनेक भाग जोडले जाणार असून दळणवळण सोपं होणार आहे. मात्र, अॅप्रोच रोडचे काम न झाल्याने या पुलावरून वाहतूक अद्यापही सुरू झाली नसल्याने हा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून हा पूल पूर्ण झाला आहे. अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेला पूल आ. निकम यांनी यासाठी पूरेसा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे पूर्ण झाला आहे. मिळालेल्या नुसार हा पूल ऑगस्ट २०२४ ला पूर्ण होणे आवश्यक होते, असे म्हटलं जाते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पूल डिसेंबर २०२४ हा पूर्ण होईल असे सांगण्यात आले. पण तेही शक्य झाले नाही. त्यानंतर कामा गती वाढल्यामुळे पूल मे २०२५ ला पूर्ण होऊन वाहतूकीस खुला होणार म्हणून चिपळूणवासिय आनंद व्यक्त करत असताना पूलासाठी अप्रोज रोड” (जोड रस्ता) नाही म्हणून उदघाटना विना तसाच राहिला आहे.

जोडरस्त्या साठी वेगळी निविदा निघायची बाकी आहे. त्यामुळे जरी पूल पूर्ण झाला असला तरी जोड रस्ता नसल्यामुळे वाहतूक होऊ शकत नाही. शहरवासियांनी मागणीकरुन देखील अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेला पूल आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे जरी पूर्ण झाला असला तरी सरकारी कामकाजातील त्रुटीमुळे पाऊस सुरु झाला असून पूराचा धोका लक्षात घेता हा चांगला पर्याय असताना खुला होऊ शकला नाही म्हणून नागरिकांमध्ये नाराजी व संताप व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर जोड रस्त्यासाठी निविदा काढून हे काम पूर्ण करून या पुलाचे लोकार्पण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 27/Jun/2025