खेड : खेड पंचायत समितीत यशवंत भांड यांच्या रूपाने कायमस्वरूपी गटविकास अधिकारी लाभलेले असतानाच अवघ्या दोन वर्षांतच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी अधिकारी न आल्यामुळे दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
यापूर्वी पंचायत समितीत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचा सुरू झालेला प्रकार वर्षानुवर्षे कायम होता. येथील पंचायत समितीत सुशांत पाटील यांची कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांची अल्पावधीतच बदली झाल्यानंतर त्यांच्या पदाचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपवला होता. यानंतर भांड यांची कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने प्रभारींचा प्रकार संपुष्टात आला होता. जिल्ह्यात ५ वर्षे सेवा बजावणाऱ्या भांड यांचीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर येथे बदली झाली आहे. त्यामुळे येथील पंचायत समितीचा अतिरिक्त कारभार दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्याकडे सोपवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 15-10-2024









