राजापूर : तालुक्यातील कुवेशी तेलीवाडी येथील 26 या तरुणाने झाडाच्या फांदीला दोरी टाकून गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. विघ्नेश संतोष कुवेसकर असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना खबर दिली.
त्यानुसार विघ्नेश याने 26 जून 2025 रोजी सुमारे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फणसे पेट्रोल पंप कुवेशी येथील कोणीचा टेम येथील जंगलमय ठिकाणी झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. याची नोंद राजापूर पोलीस स्थानकात 26 जून रोजी संध्याकाळी 7.33 मिनिटांनी अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 27/Jun/2025














