रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवाशाकडे असलेल्या स्टीलच्या डब्यातून एक लाख रुपयांची रोकड आणि 500 रुपये असलेली पर्स चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज कमलाकर भोसले (वय ३० वर्षे, रा. नेरळ, कर्जत, जि. रायगड) हे २६ जून २०२५ रोजी सकाळी ६.१९ ते ७.०० या वेळेत दिवा पॅसेंजरच्या तिसऱ्या डब्यातून प्रवास करत होते. उक्षी रेल्वे स्थानकावर गाडी येताच, त्यांच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील स्टीलचा डबा चोरून नेला.
सदर डब्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम आणि ५०० रुपयांची नोट असलेली पर्स होती. ही घटना लक्षात येताच सुरज भोसले यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 27/Jun/2025














