चिपळुणात आज पूरपरिस्थितीबाबत मार्गदर्शन शिबिर

चिपळूण : शहरासह परिसरातील नागरिकांना संभाव्य पूरपरिस्थितीबाबत सजग आणि सुसज्ज करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व चिपळूण नगरपालिका यांच्यावतीने आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहभागाने पूरपरिस्थिती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

हे शिबिर शनिवारी (ता. २८) सकाळी ९ ते ११ या वेळेत जलतरंग तलाव, रामतीर्थ तलावाजवळ, चिपळूण येथे होणार आहे. शिबिरामध्ये एनडीआरएफच्या प्रशिक्षित जवानांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 28/Jun/2025