संगमेश्वर शास्त्री पूल येथे काँक्रिटचा रस्ता खचला

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची दुरवस्था पाहून या भागातील समस्येला कुणी वाली उरलेला नाही, असे म्हणावे लागेल. संगमेश्वर शास्त्री पुलानजीक मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता खचला असून, त्याला तडे गेले आहेत. ठेकेदार संबंधित विभागाच्या देखरेखीखाली निकृष्ट काम करत आहे. ठेकेदाराने या मार्गावरील वाहतूक थांबवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले

अनेक ठिकाणी महामार्गाचे निकृष्ट काम केल्याचे उघड झाले. भेगा गेलेल्या ठिकाणी मलमपट्टी करून वाळूचा थर टाकला तरीही धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी त्या भेगांमध्ये जाऊन तडे रुंदावत असल्याचे दिसून येत आहेत.

संगमेश्वर नजीक रामकुंड येथील अवघड वळणावर ऐन पावसात मोरीला भराव घालण्याचे काम सुरू असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता असून, हे काम तातडीने बंद करण्यात यावे. येथील मोरीवर मातीचा भराव करण्याऐवजी चक्क दगड टाकले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अभियंता या निकृष्ट कामाकडे लक्ष देत नसल्याने भविष्यात दगडाच्या भरावामुळे ही मोरी खचली तर त्याला जबाबदार कोण? या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे. – संजय कदम, सामाजिक कार्यकर्ता, संगमेश्वर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 28/Jun/2025