गावतळे : दापोली तालुक्यातील जालगाव येथील हिंदुराज गोविंदा पथक हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत पथक आहे. २८ व २९ जूनला मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी व एकमेव प्रो-गोविंदा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी हे पथक रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
तेरेवायंगणी येथील मरिआई प्रतिष्ठानतर्फे हिंदुराज गोविंदा पथकाचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी पथकाचे अध्यक्ष मयूर मोहिते, प्रशिक्षक महेंद्र धाडवे, व्यवस्थापक रोहन केळसकर व सभासद महेश राळे, अमित रजपूत, राकेश भांबिड, रचित पटेल, स्वप्नील राळे, मरिआई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित जाधव, उपाध्यक्ष शैलेश भांबिड, सचिव विनय गोलांबडे, खजिनदार महेंद्र शिगवण, स्वप्नील शिगवण यांच्यासह रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सचिव आशुतोष साळुंखे, पंच सत्यवान दळवी, पंच संदीप क्षीरसागर हे उपस्थित होते. हिंदुराज गोविंदा पथक जालगाव या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे २०२२ ते २०२४ सलग तीन वर्षांत आठ थर लावण्याचा विक्रम केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 28/Jun/2025














