चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेसिक शहर कार्याध्यक्षपदी, तसेच चिपळूण तालुका महायुती समन्वयक या दोन महत्त्वाच्या पदांवर येथील उदय संभाजी ओतारी यांची निवड करण्यात आली. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
ओतारी हे पक्षस्थापनेपासूनच विद्यार्थी तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, बेसिक शहराध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या कामाची विशिष्ट शैली आणि समन्वय साधण्याची क्षमता यामुळे ते खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. निवडीनंतर ओतारी म्हणाले, ही जबाबदारी माझ्यासाठी गौरवाची असून, मी पक्षातील सर्व ज्येष्ठ, आजी-माजी पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि जनतेचा सन्मान राखून, आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत समन्वयाने कार्य करेन.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, प्रदेश महिला उपाध्यक्षा पूजा निकम, रेहाना बिजले, तालुकाध्यक्ष अबू ठसाळे आदीसह चिपळूण भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 28/Jun/2025














