मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते रोटरी स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; नील पाटणे JEE मध्ये देशात प्रथम!

खेड, (प्रतिनिधी): शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जेईई, नीट आणि सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गृहराज्यमंत्री आणि दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, श्री. योगेश कदम यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रोटरी स्कूलचे चेअरमन मा. श्री. बिपीन पाटणे यांनी प्रमुख पाहुणे श्री. योगेश कदम यांचे शाल, श्रीफळ, दुर्गामातेची मूर्ती आणि कलाशिक्षक प्रा. शुभम घड्याळ यांनी रेखाटलेले पोट्रेट देऊन स्वागत केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते राजन इंदूलकर यांचेही शाल, श्रीफळ आणि श्रीगणेशाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी रो. पराग चिखले यांनी माजी आमदार श्री. संजय कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. शशिकांत चव्हाण आणि खेडचे शिक्षणाधिकारी श्री. विजय बाईत यांचे श्रीफळ व पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमीता पटेल यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
या सत्कार सोहळ्यात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जेईई, बी. आर्च. परीक्षेत १०० पर्सेटाइल गुण मिळवून देशात प्रथम येण्याचा विक्रम रचणाऱ्या कु. नील पाटणे याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन नामांकित आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या कोकण विभागात प्रथम आलेल्या कु. ओम जैन सह कु. नील लिमये, कु. केवल खापरे, कु. अश्लेषा देवधर, कु. साहिल अंगज, कु. मानस राऊल, कु. गौरव पाटील, कु. सुयश नवरंग, कु. तेजस कुमार, कु. अन्वयी तांबे, कु. रोनक शेठ, कु. ऐनेश मालंडकर, कु. असित पवार व कु. हर्ष पवार यांचा सत्कार झाला.

नीट प्रवेश परीक्षेत कु. राहिल मुजावर व कु. वरद थोरात तसेच ९९ पर्सेटाइल पेक्षा अधिक गुण मिळवणारे कु. स्वरांगी मोरे, कु. सोनम महाले, तर ९८ पर्सेटाइल पेक्षा अधिक गुण मिळवणारे कु. मुक्ता गोखले, कु. यश माळी, कु. सृष्टी भोजने, कु. पियुष घुगरे, कु. तन्वी जैन यांचा गौरव करण्यात आला.

एम.एच.टी. सीईटी पीसीएम परीक्षेत ९९ पर्सेटाइल पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या कु. सेजल पेडणेकर, कु. अर्चना पाटील, कु. ओम जैन, नील लिमये, कु. सुरज गिम्हवणेकर, कु. अश्लेषा देवधर, कु. संस्कार साळवी, कु. तेजस कुमार, कु. पार्थ लिंगायत, कु. दिगंत हेगडे, कु. अथर्व चव्हाण, कु. वरद मेणकर, कु. अन्वयी तांबे, कु. गौरव पाटील, कु. मानस राऊल, कु. हर्ष जैन यांचा सत्कार झाला. याव्यतिरिक्त ९८ पर्सेटाइल पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या कु. कृष्णा कुलकर्णी, कु. अर्जुन केळकर, कु. विराज चाळके यांचाही गौरव झाला.

एम.एच.टी. सीईटी पीसीबी परीक्षेत ९९ पर्सेटाइल गुण प्राप्त करणाऱ्या कु. यश माळी, कु. तीर्था वैद्य, कु. यश सप्रे, कु. सिद्रा पंजारी, कु. शर्वरी घाडगे, कु. धृव साळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ९८ पर्सेटाइल पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या कु. समृद्धी कुडाळकर, कु. तेजल भगत, कु. केतकी चिखले, कु. सिद्धी महाबळ, कु. ओंकार मनवळ, कु. दुर्गा पाद्धे, कु. निरजा माळी यांचाही गौरव करण्यात आला.

इयत्ता १२ वी बोर्डाच्या विज्ञान शाखेच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणारे कु. केवल खापरे, कु. सोनम महाले तर कु. सेजल पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणारे कु. वेदांत ओक, कु. श्रीश शेट तर कु. शल्तियल काळे यांचा गौरव करण्यात आला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गृहराज्यमंत्री मा. श्री. योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते घड्याळ, स्टेथोस्कोप व फ्रेम देऊन गौरविण्यात आले.

गृहराज्यमंत्र्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
याप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नसल्याचे सांगितले. रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे नमूद करत, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी हार न मानता नव्या उमेदीने यशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आवाहन त्यांनी केले. रोटरी स्कूलने जेईई, नीट आणि सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून खेड तालुक्याची मान शैक्षणिक क्षेत्रात उंचावली असल्याचे ते म्हणाले. हे स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांनी भविष्यात त्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे, नकारात्मक विचार न करता सकारात्मक बनणे गरजेचे आहे, कोणताही दबाव न बाळगता यश संपादन केले पाहिजे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरी स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, ते न पाहता कोणते ध्येय गाठायचे आहे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनतीमध्येच यश दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पालकांसोबत त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचेही आभार मानले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व रोटरी शाळेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचे आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कृणाल मंडलिक, सौ. भक्ती करंबेळकर व सौ. सरिता भारती यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 28-06-2025