मालगुंड विद्यालयाची अमलीपदार्थ विरोधी जनजागृती प्रभात फेरी

जाकादेवी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि जयगड पोलीस ठाणे यांच्या विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मालगुंड विद्यालय ते मालगुंड बाजारपेठ अशी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर रॅली काढली.

या रॅलीत जयगड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रमेश पाटील, बाबासो बेडक्याळे, रूपेश तावडे सामील झाले होते.

अंमली पदार्थाचे सेवन केल्याने दुष्परिणाम काय होतात, तसेच हे सेवन करणे कायद्याने गुन्हा असून यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूदसुद्धा आहे, अशी माहिती जयगड पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निलेश भागवत यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी जयगड पोलिस ठाण्यातील पी. आय. कुलदीप पाटील, पीएसआय संदीप साळवी, निलेश भागवत, मिलिंद कदम, राहुल घोरपडे, आदी उपस्थित होते. स्वागत शिक्षक रमेश पाटील, तर सूत्रसंचालन मिलिंद सुर्वे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 28/Jun/2025