खेड : वडगाव बुद्रुकमधील सात गावाचा प्रश्न मार्गी

खेड : तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे लघु पाटबंधारे प्रकल्प उभारण्यासाठी ७२ कोटी २८ लाख १९ हजार ५२२ निधी मंजूर झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वडगाव बुद्रुक वडगाव खुर्द, कळंवणी खुर्द, नंदिवली, अस्तान, वाडी बीड, खालकी हुंबरी आदी गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या हस्ते नुकतेच झाले, या वेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती अरुण’ कदम, तालुकाप्रमुख सचिन कडवे युवा सेना तालुकाप्रमुख मिलिंद कात्रे आदी उपस्थित होते.

आमदार कदम म्हणाले, ‘वडगाव येथे लघु पाटबंधारे प्रकल्प उभारू असे सहा महिन्यापूर्वी जाहीर केले होते, ते आज पूर्ण झाले आहे. ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे हे धरण पूर्ण होणार आहे. महाबळेश्वरमध्ये जेवढा पाऊस पडेल त्याचे पाणी या धरणात साचून या भागात पाणीपुरवठा होईल. ज्या ग्रामस्थांनी जमिनी दिल्या आहेत, त्यांच्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात होत आहे. त्या जमीन मालकांना येत्या दीड वर्षाचा मोबदला मिळवून दिला जाईल.

ते काम मुलाने पूर्ण केले
मागील दोन वर्षात सात गावांची तहान भागवण्याचे काम आमदार म्हणून योगेश कदम यांनी केले. जे काम बाप म्हणून मी करू शकलो नाही, ते योगेश कदम यांनी केले. १८ गावांना पाणी देण्याचे काम पूर्ण केले. पण या गावात काही बेईमान लोक आलेत, त्यांना ग्रामस्थांनी बाजूला ठेवावे, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 15/Oct/2024