रत्नागिरी, दि.२८ : सर्वांना अभिमान वाटेल असं देशातील सर्वांत चांगले आणि रत्नागिरीचे भूषण ठरणारे बौध्दविहार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत उभारले जाईल, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत होणाऱ्या बौध्द विहार संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी काल आढावा बैठक घेतली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर बौध्द विहाराचे बांधकाम केले जाईल. रत्नागिरीला भूषण ठरेल असे हे विहार असेल. सर्वांच्या समन्वयाने, सर्वांना विश्वासात घेवून या विहारासाठी व्यवस्थापन समिती निर्माण केली जाईल. त्याबाबतची कार्यवाही देखील नगरपरिषदेकडून केली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 28-06-2025














