रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ आज सकाळी दहा वाजता डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाली, रत्नागिरी येथील प्रसिद्ध तरुण उद्योजक मंगेश मधुकर भस्मे (वय ४२) यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश भस्मे हे पाली येथून रत्नागिरीकडे येत असताना हातखंबा शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला एका डंपरने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात मंगेश भस्मे यांचा जागीच मृत्यू झाला.
मंगेश भस्मे हे ‘बायनरी वर्ल्ड’ या नावाने प्रिंटर सर्व्हिस स्टेशन चालवत होते. रत्नागिरी शहरातील जुना माळ नाका येथे त्यांचे हे सर्व्हिस स्टेशन होते आणि त्यांच्याकडे एचपी (HP) आणि कॅनन (Canon) या दोन नामांकित कंपन्यांची अधिकृत सर्व्हिस सेंटर होती.
अत्यंत शांत स्वभावाचे आणि सचोटीने व्यवसाय करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक कार्यक्षम आणि मनमिळाऊ व्यावसायिक गमावला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 28-06-2025














