शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरीत जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचा सेमीफायनल धमाका!

रत्नागिरी, दि. २८ जून २०२५: श्री मारुती-गणपती पिंपळपार देवस्थान आणि टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज, शनिवार, २८ जून २०२५ रोजी रात्री ७.३० वाजता भगिनी मंडळ हॉल, टिळक आळी, रत्नागिरी येथे दुहेरी सेमीफायनलचा थरार रंगणार आहे.

या स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील कॅरम खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक अटीतटीचे सामने आतापर्यंत पार पडले आहेत. आजच्या सेमीफायनलमध्ये कोणते संघ अंतिम फेरीत धडक मारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅरमप्रेमींनी या रोमांचक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 28-06-2025