संगमेश्वरात खत पुरवठा सुरळीत

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील धामणीसह बारा गावांमध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी तालुक्यात शुक्रवारपासून खतपुरवठा सुरळीत झाला असल्याचे सांगितले आहे. सर्व गावांमध्ये टप्प्याटप्पाने खत पोहोचवले जाणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 28/Jun/2025