गणेशोत्सवासाठी मुचरी परिसराकरिता एसटीच्या विशेष गाड्या

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी मुचरी युवा सामाजिक संस्था एसटीच्या विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करत आहे.

संगमेश्वर, देवरूख आणि मुचरी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठी मुचरी युवा सामाजिक संस्था एसटीच्या गाड्या प्रायोगिक तत्त्वावर सोडत आहे.

मुंबईहून गावी येण्यासाठी २४ ऑगस्ट २०२५ या दिवसाचे आरक्षण केले जाणार आहे, तर परतीच्या गाड्यांचे आरक्षण दि. ३ सप्टेंबर २०२५ या दिवसासाठी घेतले जाईल.

मुंबईहून २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता, तर मुंबईला परतण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गाडी सुटेल. आरक्षणासाठी महेंद्र महाडिक (9773782257), बाळकृष्ण महाडिक (9967607354), विलास वामन सुर्वे (8080042140), नीलेश भालेकर (7083690214), अजित महाडिक (8928729754), विनोद मिरगल (9137993137), नरेश गवली (9987240728) यांच्याशी संपर्क साधावा. परळ ते मुचरी आणि परतीच्या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ७०० रुपये तिकीट असेल. गाडीमध्ये दादर, शीव, घाटकोपर, नाहूर, जुईनगर आणि पनवेल येथे प्रवाशांना बसता येईल. आरक्षणाकरिता महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकरिता १० जुलैपर्यंत आरक्षण केले जाईल. एकदा आरक्षण केलेले तिकीट रद्द करता येणार नाही तसेच तिकिटाची रक्कम परत केली जाणार नाही. महिला आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निम्मे तिकीट दर असतील. ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्या प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेनुसार एसटी प्रवास मोफत असेल. सर्व सवलतदारांचे आधारकार्ड आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 28-06-2025