चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील ‘कृषी संघर्ष गटातील कृषीदूतांनी कापरे गावामध्ये खत व्यवस्थापनावरील सप्रायोगिक प्रात्यक्षिक आयोजित केले.
या प्रात्यक्षिकामध्ये खते (Fertilizers) वापरण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात माहिती देण्यात आली. खतांचा अयोग्य वापर केल्यास उत्पादनात घट येते तसेच मातीच्या सुपीकतेवरही परिणाम होतो, हे कृषीदूतांनी वास्तव दाखवून दिले. प्रमुख मुद्दे आणि मार्गदर्शनाचे स्वरूपः माती परीक्षण करून खतांचे नियोजन कसे करावे नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतांचा वापर अधिक खत टाकल्याने होणारी हानी आणि अनावश्यक खर्च प्रात्यक्षिकाच्या दरम्यान शंका समाधान सत्रही घेण्यात आले, ज्यात शेतकऱ्यांनी स्वतःच्या अडचणी मांडून मार्गदर्शन घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 28/Jun/2025














