रत्नागिरीत आज नारद पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या नारद पुरस्कारांचे वितरण शनिवारी २८ जून रोजी रत्नागिरीत होणार आहे.

विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पत्रकार सन्मानाचा यावर्षी रौप्य महोत्सव आहे.

त्यानिमित्ताने रत्नागिरीत हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, तर प्रमुख वक्ते म्हणून अभिजित हरकरे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे (रत्नागिरी), श्रीराम अनंत पुरोहित (कर्जत), विजय साबाजी गांवकर (सिंधुदुर्ग) आणि संदेश सोमा फडकले (तुरळ, संगमेश्वर) यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 28-06-2025