साउथमध्ये हिंदी भाषा बोलत नाहीत, मग महाराष्ट्रात सक्ती कशासाठी? : पल्लवी वैद्य

Pallavi vaidy On Hindi language Controversay: राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावरुन वादंग निर्माण झालं आहे. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केल्याने मुलांवर अतिरिक्त ताण पडेल, आणि मराठी भाषेची गळचेपी होईल, असा आरोप मराठी भाषा प्रेमींकडून केला जात आहे.

त्यामुळे राज्य सरकारने तूर्तास या निर्णयाला स्थिगिती दिली आहे. तसेच या विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्रीने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा होता दिसते आहे. ही अभिनेत्री म्हणजे पल्लवी वैद्य (Pallavi Vaidy)आहे.

अभिनेत्री पल्लवी वैद्यने ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत हिंदी भाषा सक्तीच्या मुद्दावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, “साउथला जर आपण गेलो तर तिथे आपण बघतो की तिथे हिंदी भाषेत कोणी बोलतच नाही. ते त्यांचीच भाषा बोलतात. मग आपल्या महाराष्ट्रात अशी सक्ती कशाला केलीय, माझा हा प्रश्न आहे. खरंतर, सगळ्या मराठी शाळा बंदच होत आहेत, हे दु:ख आहेच. कारण, मुळात माझं शिक्षण हे मराठी माध्यमाच्या शाळेत झालं आहे. पण, त्यामुळे माझं कुठेही अडलं नाही. मला हिंदीही तेवढचं चांगलं येतंय. कुठे गरज पडली तर इंग्लिशमध्येही बोलू शकते आणि मराठी तर उत्तमच जमतंय.” असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

वर्कफ्रंट

अभिनेत्री पल्लवी वैद्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘अजुनही बरसात आहे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. सध्या पल्लवी लक्ष्मीनिवास मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती रेणूका नावाचं पात्र साकारते आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 28-06-2025