रत्नागिरीच्या सौंदर्यात रोटरी क्लॉक टॉवरची भर; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला लोकार्पण सोहळा

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जयस्थंभ येथे आकर्षक क्लॉक टॉवरचा लोकार्पण सोहळा ना. उदय सामंत, महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालक मंत्री यांचा शुभ हस्ते करण्यात आला.

रोटरी क्लॉक टॉवर आकर्षक असून ११.५ फूट उंचीचा आहे. रोटरी टॉवर मुळे नागरिकांना वेळ समजणार असून रत्नागिरीची शोभा देखील वाढणार आहे.

क्लॉक टॉवरचा लोकार्पण सोहळा प्रसंगी सोहळा ना. उदय सामंत, महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालक मंत्री, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, विलास चाळके, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.रुपेश पेडणेकर, सचिव अॅड.मनिष नलावडे, कोषाध्यक्ष माधुरी कळंबटे, सीनियर रोटेरिअन धरमसीभाई चौहान, केशवराव इंदुलकर, विनायक हातखंबकर, अशोक घाटे, निलेश मुळ्ये, प्रमोद कुलकर्णी, श्रीकांत भुर्के, रोहित वीरकर आणि असंख्य रोटरी सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:06 28-06-2025