बोंड्ये कुणबीवाडी बंद घर फोडून अज्ञाताने लांबवले तीन लाखांचे दागिने

रत्नागिरी : तालुक्यातील बोंड्ये कुणबीवाडी येथील बंद घर फोडून अज्ञाताने तब्बल तीन लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना शनिवारी २८ जून रोजी दुपारी १२.३० ते ३.३० वा. कालावधीत घडली आहे. याबाबत शुभांगी शिवाजी भोसले (५७, रा. बोंड्ये-कुणबीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी १२.३० वा. सुमारास फिर्यादी शुभांगी भोसले या घर बंद करुन वाडीतील डॉक्टरांकडे उपचारांसाठी गेल्या होत्या.

दुपारी ३.३० वा. सुमारास त्या डॉक्टरांकडून घरी परतल्या असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजा कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी घरात जाउन पाहिले असता त्यांना घराच्या बेडरुममधील लोखंडी कपाटाचे ड्रॉव्हर कपाटाला अडकवलेल्या चावीने उघडलेले दिसले. तसेच त्यातील सोन्याचे ७ तोळे वजनाचे मंगळसूत्र, अर्धा तोळा वजनाची सोन्याची कुडी असे एकूण तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 30/Jun/2025