दापोली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी महेश तोरस्कर

दापोली : दापोली पोलिस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरस्कर यांनी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता पदभार स्वीकारला. तोरस्कर यांना पोलिस खात्यातील २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव 5 आहे. यापूर्वी त्यांनी पनवेल शहर, कळंबोळी, मुंबई सायन, ट्रॉम्बे, तसेच क्राईम ब्रँच युनिट ६ चेंबूर येथे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) म्हणून सहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.

वडाळा येथे त्यांनी प्रथमच पोलिस निरीक्षक (पीआय) म्हणून काम पाहिले. तसेच रत्नागिरी आणि देवरुख येथेही त्यांचे कार्य कौतुकास्पद राहिले आहे. स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तोरस्कर यांनी सांगितले की, दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी कडक मोहीम राबवली जाणार असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 30/Jun/2025